वृक्षारोपण निसर्गाचीच नव्हे तर समाजाची गरज- सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर कल्याणराव विधाते

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ व हवेली तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विध्यमानाने वृक्षारोपण संवर्धन समिती म्हातोबा आळंदी, मानवमित्र फाऊंडेशन पुणे व पर्यावरण संरक्षण समिती कुंजीरवाडी यांच्या सहकार्याने आळंदी म्हातोबा या ठिकाणी पर्यावरणास मदत होईल अशा वृक्षांचे रोपन सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर कल्याणराव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष राजेंद्र काळभोर, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष संदीप शिवरकर तसेच आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना कल्याणराव विधाते म्हणाले की मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने वृक्षारोपणाची, शेतीची मला आवड आहे. स्मशानभूमी म्हणाले की लोक तिथे जाण्यास घाबरत असतात परंतु येथील युवकांनी खऱ्या अर्थाने या स्मशान भूमीचे नंदनवन केलेले आहे. वृक्षारोपण सध्या निसर्गाचीच नव्हे तर समाजाची गरज आहे त्यामुळे गावोगावी ही संकल्पना राबविली जावी.

यावेळी दिलीप वाल्हेकर व गोरख घुले यांनी पर्यावरण समितीने केलेल्या कार्याचा आढावा स्पष्ट केला. ग्रामपंचायत सदस्य विनायक जवळकर यांनी पर्यावरण समितीस वृक्षारोपण करण्यासाठी आर्थिक मदत केली तसेच मानवमित्र फाऊंडेशनने विविध वृक्ष या समितीला भेट म्हणून दिली. संदीप शिवरकर यांनी ग्राहक पंचायतीच्या वतीने सचिन सुंबे यांची हवेली तालुका ग्राहक पंचायतीच्या प्रसिद्धिप्रमुख या पदावर निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियोजित अनाथ आश्रम व वारकरी शिक्षण संस्थेच्या जागेची पाहणी केली.

यावेळी सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच सोनाली माकर ग्रामसेवक पी.एस. पवार, माजी उपसरपंच तेजस शिवरकर, पत्रकार तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडके, सचिन माथेफोड, गणेश सातव, डॉ मोहन वाघ, सचिन सुबे, धनराज साळुंके, नितीन करडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकोविड मुक्त वेगरे सारख्या दुर्गम गावातील ग्रामस्थांचे मोफत लसीकरण
Next articleआस्था फाउंडेशनच्या वतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप