लोणीकंद गावच्या सर्वागीण विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध-प्रदिप कंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणीकंद (ता. हवेली) येथील दत्तनगर मुळसुंडवस्ती येथे भुमीगत गटार लाईनचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते संपन्न झाले.

शहरालगतचा भाग असल्याने लोणीकंद व परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वच ठीकाणी शासकीय निधी उपलब्ध होत नाही. अशा वेळी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा आग्रह सतत जि.प.माजी अध्यक्ष प्रदिप कंद करत असतात. दत्तनगर परिसरात जवळपास दोनशे ते तिनशे कुटुंबीय वास्तवयास आहे. यासर्वांच्या मागणीला साथ देत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भुमीगत गटार लाईनचा प्रश्न सोडवण्यासाठी जवळपास ३५०० फुट लांबीची ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्वतः ७५०००० रुपये खर्च करुन पुर्णत्वाला नेत आज लोकार्पण करुन स्थानिक ग्रामस्थांना दिलासा दिला.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच अश्विनीताई झुरुंगे, मा उपसरपंच संजय कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे मा चेअरमन जनार्दन वाळुंज, मा उपसरपंच रविंद्र कंद, शितल कंद, रामदास ढगे, ग्रामपंचायत सदस्या शैलजा कंद, जयश्री झुरुंगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय कंद, हवेली तालुका भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष झुरुंगे, सोमेश्वर पतसंस्थेचे संचालक दिगंबर कंद, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गरुड, संभाजी कंद, संभाजी मगर, शरद कंद परिसरातील कार्यकर्ते व्यंकटेश डिगे, युवराज डोंगरे, शिवाजी देशमुख, रामनाथ बो-हाडे, विकास रावत, बाजीराव औटी, संजय वाळुंज, संतोष ताठे, कैलास बारगीर, धनंजय पाटील, चतुर पाटील, नागेश जमादार, निलेश साबळे, विजय वाघमारे, कैलास सावंत, सुशांत तांबरे, संदिप धनवडे, संजय डोगडे, युवराज वाघ, कल्याण भद्रे, सोपान पाडेकर, गणेश भुजबळ, सचिन राठोड, मोहन पोले, मुकेश ठाकुर, विनायक गायकवाड, शहाजी शिंदे उपस्थित होते.

Previous articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन
Next articleथेऊर- रस्त्याच्या डागडुजीला दोन वर्षांनी सुरुवात : रस्त्याच्या कामाला न्यायालयातून स्थगिती आनल्याने या रस्त्याच्या कामास सुरुवात करता येत नव्हती- आमदार अशोक पवार