खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरूर तालुक्याच्या दौऱ्यात निमोणे येथे खासदार निधीतून मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाआधी पक्षाच्या सोशल मीडियाचे पदाधिकारी अजय हिंगे यांना भेटून येत असताना अचानक एका शेतकऱ्याने गाडी अडवली. या शेतकऱ्यांचे नाव होतं, गजानन कोरेकर.

गाडी थांबताच मी काच खाली करून नमस्कार करताच कोरेकर पाचशेची नोट पुढे करीत म्हणाले, “साहेब, याचे पेढे घ्या.” क्षणभर मला हा प्रकार समजेना. मग त्यांनीच स्पष्टीकरण दिलं. “साहेब, तुम्ही निवडून आलात की मी तुम्हाला पेढे देईन असं म्हटलं होतं. लोकसभा निवडणूक जिंकून तुम्ही खासदार झालात. पण आपली भेट झाली नाही. आज आपण अचानक आलात त्यामुळे पेढे आणता आले नाहीत, म्हणून पेढे घेण्यासाठी पैसे देतोय.” त्यांचं हे विलक्षण प्रेम पाहून खरंच मनस्वी आनंद झाला. मी त्यांना म्हणालो, “दादा पैसे राहू द्या. पुढच्या वेळी येईन तेव्हा मीच तुम्हाला पेढे घेऊन येईन.”

“खरं तरं कोरेकर हे भाजपचे कार्यकर्ते. पण माझ्या विजयासाठी त्यांनी पक्ष बाजूला सारत निवडून येण्यासाठी मदत केली होती. या निवडणुकीत मी निवडून आलो. परंतु त्यासाठी आपापले पक्ष बाजूला ठेवून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी माझं मनापासून काम केलं होतं. थोडक्यात सांगायचे तर, ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. मला विजयी करण्यासाठी संपूर्ण जनता एकवटली होती. या सर्वांचं ऋण माझ्यावर आहे. कोरेकर यांच्या निमित्ताने याची जाणीव झाली. हे ऋण असंच डोक्यावर ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन त्यातून उतराई होण्यासाठी जे शक्य ते सर्व करायचे आहे.”

Previous articleअजय हिंगे यांच्या निवासस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांची सदिच्छा भेट
Next articleलोणीकंद गावच्या सर्वागीण विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध-प्रदिप कंद