अजय हिंगे यांच्या निवासस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांची सदिच्छा भेट

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार यांनी त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे सरचिटणीस अजय हिंगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तसेच तब्येतीची विचारपूस केली तसेच परिवारासोबत संवाद साधला. उभयतांचा सहवास हा नेहमीच माझेसाठी प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असतो. उभयतांनी माझ्या पाठीवर टाकलेली थाप माझ्यासाठी ऊर्जास्रोत आहे, त्यातून अधिक चांगले काम करण्याचे बळ मला प्राप्त होणार असल्याची माहिती अजय हिंगे यांनी दिली.

यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, युवक अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, मानसिंग कोरेकर पाटील, गोपाळराव हिंगे पाटील, जितेंद्र काळे, खासदार साहेब यांचे स्वीय सहायक सावंत, तेजस झोडगे,आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleखेड सेझ बाधित पंधरा टक्के परतावा प्रश्ना संदर्भातील निवेदनांची शासनाकडून घेतली गेली दखल–एक सकारात्मक पाऊल!
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन