Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अमोल भोसले,उरुळी कांचन
धर्मदाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा स्तरावरील समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडली. सदर योजनेचा लाभ तळागाळातील गोरगरीब रुग्णांना मिळावा तसेच या योजनेची व्याप्ती वाढावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ॲप तयार करण्यात यावे. महिन्याच्या प्रत्येक ५ तारखेला जिल्ह्यातील सर्व ५७ रुग्णालयांनी योजनेअंतर्गत वापरलेल्या व शिल्लक असलेल्या निधी जिल्हाधिकारी वेबसाईटवर अपलोड करावा. याचबरोबर सर्व रुग्णालयांचे PRO रात्रीच्या वेळेस सुद्धा उपलब्ध असावेत अशा महत्त्वाच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी यावेळी केल्या. या बैठकीला अनेक रुग्णालयांचे पीआरओ उपस्थित नव्हते त्याऐवजी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच अनेक पीआरओ फोनवर उपलब्ध नसतात याबाबत आमदार अशोक पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
या बैठकीस धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे अधीक्षक अनप सर आणि उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.