हवेली- अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन

वाळुची शासनास रॉयल्टी रक्कम न भरता व वाळु वाहतुक परवाना तसेच रॉयल्टी भरलेली पावती नसताना अवैधरित्या अनाधिकृतपणे उत्खनन करून चोरी करून काढण्यात आलेल्या वाळुची वाहतुक करणेसाठी वाळु धुवत असताना मिळुन आलेल्या दोन ट्रकवर महसूल विभागाने कारवाई करून वाळूसह ट्रक असा एकूण एकूण १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी हवेली तहसीलदार यांनी बुधवार ( २३ जून ) रोजी पुणे – सोलापुर महामार्गावर सोरतपवाडी ते कुंजीरवाडी दरम्यान अवैधरित्या, अनधिकृतपणे वाळु, माती व मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई केली करण्याचे आदेश दिल्याने मी व माझ्या सोबत मंडल अधिकारी उरूळी कांचन दिपक चव्हाण तलाठी निवृत्तीनाथ गवारी, ,प्रदिप जवळकर तसेच कोतवाल सुरेश शेलार यांचे महसूल पथक पुणे – सोलापुर महामार्गावर पहाणी करत असताना त्यांना सोरतापवाडी ( ता. हवेली ) येथील गट नं १५८ मध्ये रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन वाळुने भरलेले ट्रक उभे असलेले दिसले.

पथकाने जवळ जावुन पाहणी केली असता एका ट्रकचा नंबर एमएच १४ एएच ६०१५ व दुसऱ्या ट्रकचा नंबर एमएच १२ सीटी २६१५ होता. त्या दोन्ही ट्रकच्या मागील हौदात प्रत्येकी ५ ब्रास वाळु भरलेली होती. व ती वाळु धुण्याचे काम चालु होते. ट्रक चालकांस वाळुची शासनास रॉयल्टी रक्कम भरलेली पावती व वाहतुक परवाना मागितला.

त्यावर त्या दोघांनी वाहतुक परवाना व रॉयल्टी भरलेली पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोघे अवैधरित्या अनाधिकृतपणे उत्खनन करून काढण्यात आलेल्या वाळुची वाहतुक करणेसाठी वाळु धुवत असल्याची पथकाची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी १० ब्रास वाळूसह २ ट्रक असा एकूण १४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही ट्रकचे मालक बंडु विठ्ठल सुरवसे ( वय- २९ वर्षे ) व ट्रकचालक तात्या शिंदे ( वय ३०, दोघे रा. आळंदी म्हातोबाची रोड, कुंजीरवाडी ता- हवेली ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या ट्रकचा चालक महसूल पथकाला पाहताच पळुन गेला आहे. त्यांचेवर मोटर वाहन कायदा सह पर्यावण संरक्षण अधिनियम व सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleसोरतापवाडीमध्ये कृषी संजीवनी सप्ताह साजरा
Next articleधर्मदाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा स्तरावरील समितीची बैठक