मलठण येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

दिनेश पवार,दौंड

मलठण ग्रामपंचायत या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड यांच्या वतीने विविध विकासकामे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवार (दि.24) जून रोजी माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार प्रमुख उपस्थितीत होते.

यामध्ये मलठण गावठाण येथे अंगणवाडी बांधणे,गावठाण शाळा दुरुस्ती,मिसाळवाडी येथे बंदीस्त गटर बांधणे,इंदिरा नगर ,लोंढे वस्ती,शेंडगे वस्ती,येथे रस्ता काँक्रीट करणे,दळवी वस्ती जोतीबा नगर येथे पाईपलाईन करणे,मलठण लोणारवाडी रस्ता,हनुमान वाडी येथे रस्ता करणे,भोसले वस्ती येथे पूल करणे,शाळा संरक्षक भिंत बांधणे,जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना करणे इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर थोरात वस्ती येथील लक्ष्मी मंदिर सभामंडप,दगडे वस्ती येथे नागाईदेवी मंदिर सभामंडप चे उदघाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रमेशआप्पा थोरात,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, तालूकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते,सरपंच हनुमंत कोपनर,उपसरपंच अनिता देवकाते,नवनाथ थोरात, किरण वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख
Next articleबजरंग दलाच्या वतीने ऑनलाइन शिवराज्यभिषेक सोहळा साजरा