शिरोली ग्रामस्थांचा कोरोना लसीकरणाला उत्तुंग प्रतिसाद : ३२० नागरिकांचे लसीकरण

राजगुरूनगर- शिरोली गावात आज कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी शिरोली ग्रामपंचायत व शिरोली प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत शिरोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरणाचा कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये २५० लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस तसेच ७० नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी आरोग्य विभागाच्या डॉ पूनम चिखलीकर, डॉ स्वाती पवार,डॉ.मुंडे ,डाॅ.मोहिते,डॉ. काळबांडे , परिचारिका जीवने, नेवसे,पद्मिना कांबळे, सोनावणे सर तसेच त्यांचे अनेक सहकारी तसेच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत, शिरोलीच्या माजी उपसरपंच सौ जयाताई दजगुडे ,माजी उपसरपंच सौ हिराताई वाळुंज, माजी उपसरपंच जितुभाऊ वाडेकर, माजी उपसरपंच दादा देवकर, ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली सावंत, उद्योजक दत्ताभाऊ वाळुंज, नवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदीप दजगुडे, ग्रामपंचायतचे कर्मचारी सागर वाडेकर, शिरोली शाळेचे मुख्याध्यापक राजेश कांबळे, सुपे , फुंदे ,सौ मावळे , सातपुते मॅडम,वैष्णव मॅडम,दौंडकर, साहेबराव लोखंडे, शिरोलीच्या आशा वर्कर सौ जयश्री सावंत, सौ शोभा मांजरे ,आशा खैरे आदी उपस्थित होते

Previous articleपोलीस पाटील वर्षा कड यांचे कार्य कौतुकास्पद -सरपंच विठ्ठल शितोळे
Next articleजिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख