Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण -सावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वार्ड क्रं ०३ च्या सोनवणे वस्ती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य असे समाज मंदिर व्हावे अशी अपेक्षा होती व ती आता लवकरच पुर्ण देखील होताना दिसत आहे.

सरपंच भरत तरस यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने विविध विकासकामे आणि लोकोपयोगी कामे करण्याचा धडाका लावत सावरदरी ग्रामपंचायत ही लवकरच आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवीळ यांची खात्री या निमित्ताने मिळाली आहे असे मत उपसरपंच संदिप पवार यांनी व्यक्त केले.

समाज मंदिर वाॅल कंपाऊंडचे भुमिपुजन करण्यात आले या कार्यक्रमाला सावरदरी उद्योग नगरीचे सरपंच भरत तरस, उपसरपंच संदिप बाळासाहेब पवार ,ग्रा सदस्या सौ निता शेटे, पोलिस पाटील राहुल साकोरे, मच्छिंद्र शेटे,संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पवार, श्रीहरी सोनवणे,तुकाराम सोनवणे,हिरामण सोनवणे,राघू सोनवणे,मिथुन सोनवणे,निखिल सोनवणे,करण शेटे,सामाजिक कार्यकर्ते कुंडलीक धोंडगे,सयाजी शेटे ,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष सोनवणे, दादू मेंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.