कुंजीरवाडीत पाच किलो गांजा पकडला

अमोल भोसले,उरुळी कांचन

कुंजीरवाडी ( ता हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास जेरबंद करून त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

याप्रकरणी शिवराज काशीनाथ बक्के ( वय ३९ रा, मुं. पो. उमरगा, डिग्गी रोड, मारुती मंदिराजवळ, उस्मानाबाद ) याला अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी परिमंडळ ४ व ५ कार्यक्षेत्रामध्ये पेट्रोलिंगकामी खांडेकर यांचेसमवेत पोलीस उपनिरीक्षक चव्हाण , पोलीस हवालदार चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साळुखे हे मंगळवार ( २२ जुन ) रोजी पुणे – सोलापुर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर आले होते. तेथे बक्के हा हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेवुन थांबलेला दिसला त्याच्या हालचाली पथकास संशयास्पद दिसुन आल्या. त्याची पोलीसांची नजरा – नजर होताच तो तेथून घाई घाईने निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे पथकाला त्याचे जवळील पांढ-या नायलॉन पोत्यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. त्याला दुपारी ४ – १५ वाजण्याच्या सुमारास जागीच पकडले.

बक्के जवळील पांढ-या नायलॉन पोत्याची गाठ न उघडता हाताने दाबुन पाहिले असता, त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर वास घेवुन पाहता, तो वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या पोत्यामध्ये मध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचा संशय आलेने पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा बिया – बोंडासह हिरवट काळसर रंगाचा ओलसर गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. तो जप्त करून त्याचेवर एन. डी. पी. एस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला लोणी काळभोर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Previous articleविविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उपतालुकाप्रमुख पै.विष्णुदास उर्फ बाप्पुसाहेब थिटे (राजगुरु केसरी) यांचा वाढदिवस साजरा
Next articleसावरदरीचे सरपंच भरत तरस यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे आणि लोकोपयोगी कामे करण्याचा धडाका