अखेर संगीता वानखेडे हिला अटक

Ad 1

पुणे-चाकण शहर व परिसरामध्ये तरुणांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी मागणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध राजकीय व्यक्तींवर खोटे आरोप करणे, वादकिंत पोस्ट करणे , विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या चाकण येथील संगीता वानखेडे या महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येऊन चूकीची माहिती पसरवत होती तसेच विविध पक्षाच्या पुढाऱ्यांना वर अश्लिल भाषेत आरोप व शिवीगाळ करत होती याबाबत या महिलेच्या विरोधात सायबर कायद्यानुसार राज्यात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच या महिलेने विविध तरुणांवर खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत होती .या महिलेवर बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.