Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागाच्या वतीने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त ऑनलाइन कार्यशाळेत तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक ,विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. खोडदे, शिक्षण विस्ताराधिकारी अनिता शिंदे आणि सर्व केंद्रप्रमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

योगाचे महत्त्व आणि प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती च्या शिक्षिका संगीता ढमाले यांनी योगाचे महत्व सांगितले.
तसेच सुख-शांती दैनंदिन जीवनामध्ये योगाचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले .योग हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे.शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा म्हणजे श्वास आहे. त्यामुळे योगाचे अगणित फायदे होतात. मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाते. सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात योगा प्राणायाम ध्यान करणे फायदेशीर ठरत आहे .प्राणायामामुळे ऑक्सिजन लेवल आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते .शरीर लवचिक आणि तंदुरुस्त बनते. ध्यान केल्याने मन शांत आणि आनंदी राहते. यात प्रामुख्याने सूक्ष्म योगा – बैठी आसने मच्छिंद्रासन,पर्वतासन, योगमुद्रा, नौकासन, धनुरासन, शलभासन , भस्रिका प्राणायाम आणि ध्यान इत्यादी प्रात्यक्षिके घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी भ्रमरी प्राणायाम फार उपयुक्त आहे त्यामुळे मन एकाग्र होते आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरापूर शाळेच्या शिक्षिका उषा टाकळकर यांनी केले. शुभांगी पाडेकर ,स्वप्नजा मोरे सुनिता वाळुंज आणि विद्यार्थ्यांनी कार्यशाळे विषयीचे स्वअनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी हसत खेळत योग्य प्रात्यक्षिकाचा आनंद लुटला कार्यक्रमाचे आभार भारती देवरुखकर यांनी मानले.
Download WordPress Themes Nulled and plugins.