दौंड च्या पूर्वभागात कोरोना चा विळखा वाढतोय

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणाना कोरोना ची लागण झाल्याचे दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सांगितले,हे कुटुंब नाशिक येथे रुग्णास भेटायला गेले होते,आलेगाव येथे आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांच्यावर दौंड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते दरम्यान त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता,पती,पत्नी,व दोन मुले यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सांगितले.

काल दिवसभरात दौंड शहर चार व तालुक्यात पाच रुग्णांची टेस्ट पोजिटिव्ह आली आहे, दौंड शहरात ख्रिशन कॉलनी जवळील अपार्टमेंटमध्ये एक,शिवराजनगर येथे एक,समतानगर येथे एक व सरपंचवस्ती येथे एक असे एकूण चार जणांचे रिपोर्ट पोजिटिव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले

जाहिरात