देऊळगाव राजे च्या उपसरपंच पदी सुलोचना तावरे यांची बिनविरोध निवड

दिनेश पवार-दौंड-(प्रतिनिधी)

देऊळगाव राजे च्या उपसरपंच पदी सुलोचना शिवाजी तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,वृषाली औताडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते, या रिक्त जागेवरती सुलोचना तावरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी सरपंच सौ.स्वाती अमित गिरमकर,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणेजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी.आमदार-मा. रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दौंड तालुकाध्यक्ष-मा.आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य-मा. वीरधवल बाबा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्तरावर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे नवनिर्वाचित उपसरपंच यांनी सांगितले

Previous articleब्लुमिंग्डेल स्कूलने सलग सहाव्या वर्षी ठेवली १०० % निकालाची परंपरा कायम
Next articleदौंड च्या पूर्वभागात कोरोना चा विळखा वाढतोय