ऊरुळी कांचनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

 राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तब्बल ६० जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले

अमोल भोसले,
शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून उरुळी कांचनसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तब्बल ६० जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्यासह ,२ लाख ४६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. ती माहिती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वत: पथकाबरोबर जाऊन पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरातील गारवा हॉटेल जवळ मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्यांच्या जुगाराचा क्लब चालवत आहेत. याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे ‘रम्मी’चा खेळ सुरू होता. पोलिसांनी या सर्वांना पकडत चौकशी सुरू केली. त्यानुसार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री केली आहे.

Previous articleलोणी काळभोरला हातभट्टयांवर छापा
Next articleचोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेले जेरबंद