लोणी काळभोरला हातभट्टयांवर छापा

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह लोणी काळभोर व परिसरात अवैधरित्या गावठी (हातभट्टी) दारू तयार करीत असलेल्या अड्ड्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १८) छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडील सुमारे १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

आशा शिवाजी तरंगे (वय- ३५, रा. दत्तवाडी, उरुळीकांचन ता. हवेली),लता अरविंद रजपुत (वय-४२, रा. गोळीबार मैदान, दत्तवाडी, उरुळी कांचन ता. हवेली) राधेशाम हरीराम प्रजापती (वय ३०, रा. बगाडेमळा, दत्तवाडी, उरुळीकांचन ता. हवेली) व सावन सुरेश बिरे (वय- ३५, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू तयार करणार्‍या इसमावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ऊरुळी कांचन येथील तीन व लोणी काळभोर या ठिकाणी एक अवैध रित्या दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती एका खबर्‍यामर्फत पोलिसांनी मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी ऊरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरातील शेतजमीनीमध्ये आशा तरंगे, लता राजपुत, राधेश्याम प्रजापती, व लोणी काळभोर येथील सावण बिरे हे इसम अवैधरित्या दारू भट्टी चालवीत होते. हातभट्टीवर जाऊन पाहणी केली असता दारू तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे रसायन आढळून आले. पोलिसांनी बनावट रसायन नष्ट केले.

ही कारवाई, पूर्व प्रादेशिक विभाग अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उप आयुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ऊरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, राजू महानोर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एम.जी. दिवेकर, पोलिस हवालदार भारती होले, सुनिल शिंदे, संतोष अंदुरे, नवनाथ सुरवसे, तुकाराम पांढरे, रोहिदास पारखे आणि राजेंद्र दराडे यांच्या पथकाने केली.

Previous articleपाठीमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील आई , वडील व मुलाचा जागीच मृत्यू
Next articleऊरुळी कांचनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा