सासवड – उरुळी कांचन बससेवा होणार सुरु: आण्णा महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

अमोल भोसले,उरुळी कांचन

सासवड उरळी कांचन पीएमपीएमएल बससेवा शिंदवणेमार्गे रविवार (दि.२०) पासून सुरु होत आहे. शिंदवणेमार्गे बससेवा सुरु करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी सांगितले कारण येथील मुलांच्या शिक्षणाच्या दुष्टीने तसेच व्यवसाय निमित्ताने या परिसरात असणारे नातेसंबंध त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासाच्या निमित्ताने होणारा त्रास या बससेवाच्या निमित्ताने कमी निश्चितच होणार असल्याचे सांगितले.

तसेच यासंदर्भात शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार, पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप, पीएमपीएमएल विभागाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांना  महाडिक यांनी निवेदन देऊन पाठपुरावा केला.

Previous articleइरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोलिस बांधवांना मदत
Next articleपाठीमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील आई , वडील व मुलाचा जागीच मृत्यू