ब्लुमिंग्डेल स्कूलने सलग सहाव्या वर्षी ठेवली १०० % निकालाची परंपरा कायम

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी संचलित ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
स्कूल मधील इयत्ता दहावीतील परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून सलग सहाव्या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व खजिनदार गौरी बेनके व प्राचार्य उषा मूर्ती यांनी दिली.

शाळेचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – हर्ष संदीप गुंजाळ (९६%), द्वितीय क्रमांक – तनिष्का गणेश तेली (९५.८ %), तृतीय क्रमांक – ओम संजय गुंजाळ (९४.६%).
यावर्षी शाळेचे एकूण ४० विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत बसले होते. यातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून आठ विद्यार्थ्यांनी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांनी ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे. येथील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अभ्यासाची महत्वाची सूत्रे शिक्षकांनी विकसित करून विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. शाळेच्या प्राचार्या उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाने तसेच दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
शाळेतील शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे ब्रीद आहे असे मत संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके यांनी व्यक्त केले. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपामध्ये ज्ञानाच्या मार्गदर्शनाने आपला विद्यार्थी कसा अग्रेसर राहील याची काळजी संस्था नेहमी घेते असेही गौरी बेनके म्हणाल्या.
ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक अध्यापन प्रणाली, उच्च शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास, ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण प्रभावी केले जात आहे.

Previous articleदेऊळगाव राजे मध्ये आर्सेनिक अलब्म 30 या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप
Next articleदेऊळगाव राजे च्या उपसरपंच पदी सुलोचना तावरे यांची बिनविरोध निवड