मुळशी अग्नितांडवतील वेगरे गावातील पीडित संगीता पोळेकर यांच्या तेरावा विधीचा संपूर्ण खर्च वेगरे ग्रामस्थ उचलणार- सरपंच मींनाथ कानगुडे व भाऊ मरगळे

मुळशी – तालुक्यातील पिरंगुट मधील एसव्हीएस  कंपनीमध्ये मागील आठवड्यात झालेल्या दुर्घटनेत वेगरे गावातील मारुती पोळेकर यांच्या पत्नी संगीता कोळेकर यांना जीव गमवावा लागला होता. पोळेकर कुटुंब हे मूळचे वेगरे गावचे सण 1997 मध्ये पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने टेमघर धरण बांधलेमुळे त्यांचे घर पाण्यात गेले, तेव्हापासून ते रोजगारासाठी पिरंगुट ,घोटावडे फाटा येथे कारवीच्या कुडाची झोपडी बांधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मारुती पोळेकर हे स्वतः आचारी काम करत तर त्यांच्या पत्नी या मोलमजुरी करत या कष्टातून त्यांनी या परिसरात एक गुंठा जागा घेऊन त्यावर पक्के घर देखील बांधले आहे..

परंतु अशातच सण 2009 साली त्यांच्या एकुलता एक हाताशी आलेल्या मुलाचे वयाच्या 19 व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्या दुःखातून सावरत नाही तोच त्यांच्या पत्नीचा s.v.s. कंपनीच्या आगीमध्ये मृत्यू झाला आहे.याची राज्य व केंद्र सरकारने योग्य ती दखल घेत तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल परंतु सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला सांत्वन भेटी दरम्यान शनिवारी एकोणीस तारखेला तेराव्या विधीच्या खर्चासाठी आर्थिक अडचण असल्याचे जाणवल्यानंतर वेगरे गावचे सरपंच मिंनाथ कानगुडे, माजी सरपंच भाऊ मरगळे व राजेंद्र गुंड यांनी तात्काळ मदत जमा करून याबाबततिचा सर्व खर्च वेगरे ग्रामस्थ करतील असे सांगून आवश्यक ती आर्थिक मदत सदर कुटुंबीयांकडे वेगरे ग्रामस्थ व सरपंच मींनाथ कानगुडे व मित्र परिवाराच्या वतीने रोख स्वरूपात तात्काळ देण्यात आली. यावेळी राजेंद्र गुंड, संतोष आखाडे , रामचंद्र मरगळे ,अशोक गोविलकर ,दिलीप पोळेकर ,वाघु पोळेकर ,दत्तात्रेय उभे इत्यादी, उपस्थित होते.

तसेच यापुढील काळात शासन दरबारी आवश्यक त्या ठिकाणी व प्रामुख्याने राज्यमंत्री मा.बच्चू कडू यांनी जाहीर केल्याप्रमाणे सदर कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करू असा ठाम शब्द माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी दिला.

Previous articleहवेली तहसीलदाराच्या शासकीय वाहनचालकाची गळफास घेऊन आत्महत्या, महसूल विभागात खळबळ
Next articleपत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सिल्व्हर ओक या निवासस्थानी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट