हवेली तहसीलदाराच्या शासकीय वाहनचालकाची गळफास घेऊन आत्महत्या, महसूल विभागात खळबळ

अमोल भोसले,पुणे

हवेलीचे तहसीलदार यांच्या वाहनाचे तब्बल १२ वर्ष सारथ्य करणारे हजरजबाबी गुणवंत वाहनचालक अरुण मधुकर दिक्षित (वय 50 रा. जुनी सांगवी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. अध्यात्म व व्यायाम यांचे त्यांना चांगलेच आकलन असलेमुळे ते महसूल विभागात खूप लोकप्रिय होते.त्यांचे आकस्मिक निधनाबद्दल विविध तहसीलदारांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
      याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद करण्यात आली आहे.  दीक्षित हे हवेली तहसील कार्यालयात  शासकीय वाहन चालक होते. त्यांनी सुमारे २२ वर्षे वाहनचालक म्हणून शासकीय सेवा बजावली आहे. आयुक्त कार्यालय पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय, भोर तहसील कार्यालय व हवेली तहसील कार्यालय येथे त्यांनी आपली कामकाजाची सेवा बजावली आहे. गुरुवार दि.१७ रोजी दुपारनंतर अरुण दिक्षित यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपासून ते घरीच होते.त्यांना पित्ताचा त्रास होता. दुपारनंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे.त्याठिकाणी सुसाईड नोट मिळालेली नाही. पुढील तपास सुरू आहे.
Previous articleरुग्णालयसमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन सिलेंडरची चोरी
Next articleमुळशी अग्नितांडवतील वेगरे गावातील पीडित संगीता पोळेकर यांच्या तेरावा विधीचा संपूर्ण खर्च वेगरे ग्रामस्थ उचलणार- सरपंच मींनाथ कानगुडे व भाऊ मरगळे