रुग्णालयसमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन सिलेंडरची चोरी

प्रमोद दांगट : निरगुडसर

मंचर येथे रुग्णालयात समोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील ९ हजार ५०० रुपये किंमतीच्या ऑक्सिजन सिलेंडरची चोरी झाल्याची घटना ( दि. ६ ) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद रुग्णवाहिका चालक अमित शांताराम काटे ( वय २८,रा.चांडोली खुर्द काटेमळा ता.आंबेगाव पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमित काटे यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेली एम. एच.१४ सी.डब्लू २७६३ ही रुग्णवाहिका त्यांनी दि.६/६/२१ रोजी सिद्धी हॉस्पिटल च्या समोर पार्किंग मध्ये लावली होती. त्यानंतर ते घरी गेले होते.सकाळी ते रुग्णवाहिकेत जवळ आले व रुग्णवाहिका कामावर नेण्यासाठी आत बसले असता त्यांना पाठीमागे रुग्णांसाठी ठेवलेला ऑक्सीजन सिलेंडर व त्यात असलेला फलो मीटर दिसून आला नाही. याबाबत त्यांनी आजूबाजूला व ओळखीच्या रुग्णवाहिकेच्या चालकांकडे चौकशी केली असता ऑक्सीजन सिलेंडर मिळून आला नाही त्यानंतर त्यांनी सिद्धी हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता त्यामध्ये २ इसम रुग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडर मध्यरात्री २:१४ वाजताच्या सुमारास घेऊन जात असल्याचे दिसले.ऑक्सीजन सिलेंडर चोरी केल्याची खात्री झाल्याने काटे यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हीले करत आहे.

Previous articleपोलीस असल्याचे सांगून दागिने लुटले
Next articleहवेली तहसीलदाराच्या शासकीय वाहनचालकाची गळफास घेऊन आत्महत्या, महसूल विभागात खळबळ