साखरपुडा करून लग्नास नकार दिल्याने मुलासह चार जणांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

साखरपुडा करून लग्नास नकार दिल्याने खेड तालुक्यातील मुलासह त्याचे आई-वडील व भावावर मंचर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथील तरुणीने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील तरुणीचे लग्नाचे वय झाल्याने तिचे कुटुंबीय तिच्यासाठी मुले शोधत होते. तरुणीच्या आत्याने तोंड ओळख असलेल्या विमल विष्णू आरगडे यांच्या मुलाचे स्थळ सुचवले त्यानंतर दिनांक 21/3/2021 रोजी मुलीला पाहण्यासाठी मुलगा विशाल विष्णू आरगडे ,आई विमल विष्णू आरगडे, वडील विष्णू दगडू आरगडे , भाऊ अनिकेत विष्णू आरगडे, ( रा. कडूस ता. खेड पुणे सध्या राहणार नवी मुंबई ) व एक मित्र व शेजारील महिला असे पाहण्यात आले होते. त्यावेळी तरुणीच्या घरच्यांनी त्यांचा पाहुणचार केला व लग्न संदर्भात 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी मुलाच्या आईवडिलांनी आम्हाला मुलगी पसंत असल्याचे सांगितले.

त्यानंतर मुलगा विशाल यांनी दिनांक 13/4/2021 रोजी माझा वाढदिवस असून आपण त्यादिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम करून असे सांगून साखरपुडा हा मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे व त्याचा खर्च मुलीच्या घरच्यांनी करण्याचे सांगितले. मुलीकडच्यांना ही गोष्ट मान्य करत कोरडा गंध लावून लग्न पक्के झाल्याचे ठरले.त्यानंतर मुलाच्या आईने दि.10 रोजी फोन करून आम्हाला सुतक असून साखरपुडा 14 तारखेला ठेवा असे सांगितले. त्यानुसार मुलीच्या कुटूंबियांनी दि.14 रोजी मंचर येथील अद्यारोहन सोसायटी येथे 100 ते 150 लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या अंगावर पाच तोळे दागिने घातले होते.तसेच साखरपुड्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

त्यानंतर दि.16/4/21 रोजी मुलीच्या घरच्यांना फोन करून सांगितले की मुलगा विशाल यांचे कोणातरी मुली बरोबर प्रेम संबंध असून तो लग्न करणार नसल्याचे सांगितले या बाबत मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या कुटुंबाना चौकशी केली असता त्यांनी प्रेम संबंधातून विशाल ला मारायला मुले आली असल्याने तो कुठेतरी निघून गेला असल्याचे सांगितले.व त्याचा मोबाईल बंद होता.या बाबत मुलीची फसवणूक झाल्याने लक्षात येताच तिने मुलगा व त्याचे आई ,वडील,भाऊ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर एस.एस.खबाले करत आहेत.

Previous articleलोणावळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा ; ६७ लाख लुटले
Next articleपोलीस असल्याचे सांगून दागिने लुटले