देऊळगाव राजे मध्ये आर्सेनिक अलब्म 30 या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप

Ad 1

दिनेश पवार- दौंड(प्रतिनिधी)

श्रीमंत बाबाजीराजे भोसले सामाजिक प्रतिष्ठान, देऊळगांव राजे यांच्या वतीने आयुष मंञालय, भारत सरकार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निर्देशीत केलेले होमिओपॅथी औषध (Arsenic album 30) हे सामाजिक बांधिलकी म्हणून तज्ञ्यांच्या सल्ल्याने ,व डॉ. प्रशांत घोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगांव राजे व परिसरातील अत्यावश्यक सेवेतील व इतर सुमारे ४०० कुटुंबांना प्रतिष्ठान च्या वतीने वाटप करण्यात आले.

या उपक्रमात प्रतिष्ठाण चे मा. देवेंद्र आवचर,मा. शांतीलाल गिरमकर, मा. प्रशांत आवचर,मा.विष्णुपंत माने(वकील साहेब),मा.रामभाऊ डोंगरे सर,मा.प्रवीण बाराते,मा.दिनेश पवार,यांनी सहभाग घेतला, श्रीमंत बाबाजीराजे भोसले प्रतिष्ठाण च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यामध्ये,निरोगी आरोग्यासाठी योगा दिनाच्या दिवशी सहज योगा,विद्यार्थी विकास शिबीर,आत्मनिर्भर कौशल्य विकास असे उपक्रम राबविण्यात आले आहेत