लोणावळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा ; ६७ लाख लुटले

लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये ५० लाख रुपये रोख व १६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकी खोलून सहा जणांनी धारदार शस्त्रांसह घरात प्रवेश केला. तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून हात पाय बांधून घरातील रोख रक्कम व सोनं असा ऐवज लुटला. अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरून फरार झाले.

 

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली

Previous articleविनयभंग करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद
Next articleसाखरपुडा करून लग्नास नकार दिल्याने मुलासह चार जणांवर गुन्हा दाखल