विनयभंग करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

विनयभंग करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारेगाव (ता. शिरूर) येथून बुधवारी ( ता. १६) अटक केली.

श्रीकांत मिनीनाथ जगदाळे (रा. करडे ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी देलेल्या माहितीनुसार , रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी श्रीकांत जगदाळे याने एका महिलेच्या घरात घुसून विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आरोपीला पकडण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सुचना दिल्या होत्या.

सदर पथकाला आरोपी श्रीकांत जगदाळे हा कारेगाव (ता. शिरूर ) परिसरात बुधवारी ( ता. १६) येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापाला रचला होता. या सापळ्यात आरोपी श्रीकांत अलगत अडकला. सदर आरोपीला पुढील कारवाई साठी रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे
जनार्दन शेळके, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, अजित भुजबळ, राजू मोमीन,मंगेश थिगळे,गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे आणि अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleवडिलांच्या तेराव्या दिवशी रोपांचे वाटप
Next articleलोणावळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा ; ६७ लाख लुटले