वडिलांच्या तेराव्या दिवशी रोपांचे वाटप

दिनेश पवार,दौंड

वडिलांच्या मृत्यूनंतर हिंदू संस्कृती च्या रितिरिवाजाने मुलाने सर्व विधी करत असताना तेराव्याच्या दिवशी वडिलांची आठवण म्हणून तसेच पर्यावरण संवर्धनाची कास धरून उपस्थित पाहुण्यांना केशर जातीच्या आंब्याच्या रोपे भेट देऊन एक आदर्श उपक्रम राबविला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,लोणारवाडी (ता.दौंड) येथील स्व.तुकाराम लक्ष्मण धगाटे यांचे (दि.3) जून रोजी दुःखद असे निधन झाले, वडील 1984 सालचे जुने वाणिज्य शाखेतील पदवीधर त्यांनी नोकरी च्या मागे न लागता उत्तम शेती केली,दोन मुली व एका मुलाला उच्चशिक्षित केले, त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण,शुद्ध विचारसरणी जोपासण्यासाठी अध्यात्म स्वीकारले त्यांचा हा वसा हाती घेऊन मुलगा महेश धगाटे यांनी वडिलांच्या तेराव्याच्या विधीत उपस्थित पाहुण्यांना वृक्ष वाटप केले .याबाबत धगाटे म्हणाले की वडिलांनी आम्हाला सामाजिक बांधिलकी बरोबर पर्यावरण संवर्धनाची देखील शिकवण दिली आहे त्यांची ही शिकवण मी पुढे नेत हा उपक्रम राबविला आहे. सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येऊन कार्य करणे गरजेचे आहे.

Previous articleसंजय गांधी योजनेच्या सदस्यपदी विक्रम साबळे यांची निवड
Next articleविनयभंग करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद