दौंडमध्ये डबल शीट फिरणाऱ्यां वर होणार कारवाई

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

दौंड शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होत आहे त्यामुळे केवळ मास लावून उपयोग नाही तर डबलसीट मोटार सायकलवर फिरणे सुद्धा बंद करावे लागेल डबल सीट मोटरसायकल वर बसल्याने एकमेकांचा स्पर्श एकमेकाला होतो व जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे दौंड नगरपालिका हद्दीमध्ये डबलसीट फिरणारा यांच्यावर सक्त कारवाई होणार आहे असे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले.

दौंड शहरामध्ये कोणीही डबल शीट फिरू नये,मास्क वापरावा,विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, मोकाट फिरणे, गर्दी करून थांबणे,हे प्रकार टाळावे,घरी रहा,सुरक्षित रहा,प्रशासनास सहकार्य करा,नेमून दिलेल्या वेळेत अत्यावश्यक सेवांची पूर्तता करा व सर्व जनतेने सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे

Previous articleजमिनीच्या वादातून पुतण्याची वृद्ध चुलता,चुलतीला बेदम मारहाण
Next articleदेऊळगाव राजे मध्ये आर्सेनिक अलब्म 30 या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप