डिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गाड्यांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील दत्तवाडी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दत्ता विनोद रणधीर (वय २२), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय २७), वैभव राजाराम तरंगे (वय १९), प्रतीक बन्सीलाल तांबे (वय २६) चौघेही (रा. दत्तवाडी उरुळी कांचन) स्वरूप विजय रायकर (वय-२३, रा. सूर्यवंशी मळा ,अष्टापुर फाटा ) आणि धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय ३४, रा. टिळेकरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.


सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आरोपींना पकडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, विजय कांचन, राजु मोमिन, अभिजित एकशिंगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, धिरज जाधव, पूनम गुंड आणि दगडू विरकर यांचे पथक तयार करण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते आणि दौंडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे विशेष सहकार्य मिळाले.

Previous articleआमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सरपंच विठ्ठल शितोळे
Next articleराजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त डब्बेवाल्यांना किराणा किटचे वाटप