आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण

दिनेश पवार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष युवराज दळवी व वाघेश्वर उद्योग समूहाचे विजय गायकवाड यांचे माध्यमातून बकोरीच्या डोंगरावर 250 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

पुणे जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांनी बकोरीचे डोंगरावर माहिती सेवा समितीचे माध्यमातून लावलेल्या 21000 झाडे पाहून त्यांनी वारघडे परीवार व समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांना भेटून बकोरीचे डोंगराचा विकास करण्याबाबतचे आश्वासन दिले .

समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी 5 लाख झाडे लावण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याचे आव्हान केले.


यावेळी जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे,उपजिल्हा प्रमुख संजय सातव,तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे,महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समिती अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,सूर्यकांत तांडीले,युवासेना सचिव विशाल सातव,राजेंद्र तांबे,अल्काताई सोनवणे,दत्ताजी बँडवाले, सुनील नामदेवराव तांबे,साईनाथ वाळके, नवनाथ सातव,संतोष कावरे, सुमित सातव, सचिन पवार, सुहास शिंदे,दिपक शिंदे,तानाजी सातव,भारत जोगे,नितीन लांडे, मारुती कोळपकर,दिपक बारगुजे, रोहित दळवी, रोहन दळवी, बाळासाहेब भाडळे, मोहन यादव, संदेश यादव,गणेश जाधव, प्रकाश नागरवाड,चैतन्य पवार,गणेश गवार, मनोज मिश्रा, सुनील कुटे, राहुल जाधव,पांडुरंग वारघडे ,चंद्रकांत पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावर असणारे अपघाती वळण दुरुस्त करून ‘सरळ’‌ करण्याची मागणी
Next articleअट्टल दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया