वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावर असणारे अपघाती वळण दुरुस्त करून ‘सरळ’‌ करण्याची मागणी

गणेश सातव, वाघोली

वाघोली-आव्हाळवाडी रस्ता हा पुणे -सोलापूर या दोन महत्त्वाच्या महामार्गाला जोडणारा रस्ता.या रस्त्यावरुन आव्हाळवाडी, मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक पुढे हडपसर व सोलापूर महामार्गावर जाणारे वाहनचालक प्रवास करत असतात.रोज शेकडो छोटी-मोठी,त्याचबरोबर मालवाहतूक करणारी जड वाहने या रस्त्यावरून जात असतात.

या रस्त्यालगत वाघोली गावच्या हद्दीत गट नं.११३६ या शेतजमीनीच्या जागेत जुने खंडोबा मंदिर आहे.फार पुर्वी मंदिरा समोरुनचं हा रस्ता गेलेला आहे. मंदिरासमोरुन जाणाऱ्या या रस्त्यावर मोठे अपघाती वळण आहे.या वळण रस्त्यावर सर्रास छोटे-मोठे अपघात होत असतात. अपघातात काहींना कायमस्वरूपी अपंगत्व हि आलेले आहे.

नुकतेच आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या आमदार निधीतून या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.कामात मंदिरापासून पुढे ८०० मीटर सिमेंट रस्ता व पुढे ३०० मीटर डांबरीकरण असणार आहे.जवळपास २ कोटी ७० लाख रुपये निधीचे हे काम आहे.परिसरात वळणाबरोबरचं ओढ्यास्वरुप खोलगट क्षेत्र असल्याने पाऊसाळ्यात नेहमीचं रस्त्यावर व आजूबाजूला पाणी साठून राहत असते.त्यामुळे वळण सरळ करण्याबरोबरच सदर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर भर देणे गरजेचे आहे.

आमदार अँड.अशोकबापू पवार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग,हवेली यांनी संबधीत कामाचे कंत्राटदार यांना योग्य त्या सुचना दिल्यास मंदिर परिसरातील अपघाती वळण रस्ता दुरुस्त होऊन सरळ होण्यास मदत होईल.

याबाबत ग्रामपंचायत वाघोली व स्थानिक शेतकरी यांनी सदर अपघाती वळण रस्ता दुरुस्त करुन सरळ करावा याबाबतचे विनंती पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग, हवेली क्र.१ यांना दिले आहे.

Previous articleदीड वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या:चार जणांना अटक
Next articleआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण