दौंड तालुक्यात कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांची मागणी

दिनेश पवार,दौंड-तालुक्यातील शेतकर्‍यांचे विविध प्रश्नांबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी भेट घेऊन दौंड तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र  सुरू करण्याची  मागणी केली आहे

तालुक्यात वाढत असलेली बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांची कोलमडलेली अर्थव्यवस्था या गोष्टी लक्षात घेता तालुक्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग तयार होणे आवश्यक असून युवकांना व शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण मिळावे या करिता राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र करावे ही मागणी करण्यात आली.

या बाबत मंत्री महोदयांनी त्वरीत अहवाल मागवला आहे व तालुक्यातील असणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक गटाला सहाय्य करणार असल्याचे सांगितले
यावेळी शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप उपस्थित होते.

Previous articleमराठा आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांचा जनतेशी संवाद
Next articleदीड वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या:चार जणांना अटक