मराठा आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांचा जनतेशी संवाद

दिनेश पवार,दौंड

खासदार छत्रपती संभाजी महाराजांचे मराठा क्रांती मोर्चा दौंड शहर व तालुका यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले, राजेंचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देत स्वागत करण्यात आले,मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यामुळे राज्यातील मराठा समाज तीव्र नाराज झाला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासंदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, समाजाला योग्य न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून राज्यातील जनतेशी संवाद साधत पुण्याहून कोपर्डी येथे जात असताना दौंड येथे मराठा क्रांती मोर्चा दौंड शहर व तालुक्याच्या वतीने राजेंचे स्वागत करण्यात आले, राजे पाटस,दौंड, काष्टी, श्रीगोंदा मार्गे कोपर्डी येथे भेट देवून औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळाला भेट देण्यासाठी पुढे रवाना झाले,यावेळी नंदू नाना जगताप, विक्रम बाबा पवार, आदिनाथ थोरात,दादासाहेब नांदखिले,गणेश काकडे,शैलेश पवार, उमेश वीर,मयूर सोळसकर,युवराज राजे भोसले,निखिल स्वामी,अविनाश गाठे, सोमनाथ लवंगे,तसेच मोठ्या प्रमाणात महिलाही देखील उपस्थित होते

Previous articleबोरिबेल शिंगाडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
Next articleदौंड तालुक्यात कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांची मागणी