बोरिबेल शिंगाडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

दिनेश पवार,दौंड

बोरिबेल ( शिंगाडेवाडी) येथील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम होत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या विकास योजना ग्रामीण भागात यशस्वी पणे राबवून कृतीशील नेतृत्व अशी ओळख वीरधवल जगदाळे यांनी दौंड च्या पूर्व भागात निर्माण केली आहे.

गाव पातळी,वाड्या, वस्त्या वरती देखील योजना राबवून विकास कामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे, या प्रसंगी गावातील भाऊसाहेब शिंगाडे, वासुदेव अवचर, डॉ. लगड व गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. गेले अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व मुलींच्या वस्तीगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध -आमदार अशोक पवार
Next articleपत्रकार बांधवांनी बातमीदारी बरोबरचं सामाजिक बांधिलकी जपून समाजहिताचे उपक्रम राबवावेत – पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी