कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व मुलींच्या वस्तीगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध -आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व शिरूर तालुक्याच्या वैभवात भर पाडण्यासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व मुलींचे वस्तीग्रहाचे काम लवकरच प्रगती पथावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगून, शासनाच्या वतीने शिरूर तालुक्यातील काही गावात ऑक्सीजन प्लाट सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी तमाम शिवप्रेमींची भावना असून यासाठी बाजार समिती सभापती शंकरराव जांभळकर व माजी सभापती शशिकांत दसगुडे च्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून लवकरच या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसणार असून, त्यामुळे शिरूर तालुका व शिरूर शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

तसेच शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात कॉलेजेस असून शिरूर तालुक्यासह इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणासाठी येत असतात राहण्यासाठी त्यांची मोठी गैरसोय होत असून या मुलींच्या साठी लवकरच बाजार समिती आवारात जागा पाहून मुलींचे वस्तीग्रह बांधणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये शिरूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवली आहे. परंतु रांजणगाव औद्योगिक वसाहत व सणसवाडी येथे दोन ऑक्सीजन प्लांट सुरू केले आहे. त्यातून ऑक्सिजनची गरज भागवली गेली. परंतु यापुढील काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून शासनाच्या वतीने शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्या सी एस आर फंडातून व जिल्हा नियोजन समिती ( डीपीसी) मधून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, शिरूर, न्हावरे, पाबळ मलटण येथे ऑक्सीजन प्लांट सुरू करणार असल्याचेही अशोक पवार यांनी सांगितले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी अनेक दिवसापासून शिवप्रेमींची मागणी होती. आमदार अशोक पवार व बाजार समितीचे सभापती यांच्या प्रयत्नातून हा पुतळा लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन आमदार अशोक पवार यांनी दिल्याने शिरूर तालुक्यातील व शिरूर शहरातील शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Previous articleरेल्वे भूसंपादनासाठी खरपुडी ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका
Next articleबोरिबेल शिंगाडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ