जांभोरी- बिरसा मुंडा शहीद दिन साध्या पद्धतीने साजरा

आंबेगाव- तालुक्यातील जांभोरी येथे बिरसा मुंडा शहीद दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.बिरसा मुंडा यांचा झारखंड रांची या गावी जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला मुत्यु 9 जुन 1900 रोजी झाला बिरसा मुंडा राघोजी भांगरे लायन हारटेड होनाजी भागू केंगले या आद्यक्रांतिकारक यांनी इंग्रजी सावकारशाईविरुद्ध बंड पुकारला होत. उलगुलान या बंडाच नाव होतं जांभोरी हि आद्यक्रांतिकरक होनाजी केंगले यांची जन्मभूमी .होनाजी केंगले यांनी हत्तीचंद गुप्तचंद व्याज देणाऱ्या सावकारांचे नाके कापली होती. बिरसा मुंडा राघोजी भांगरे होनाजी केंगले यांनी जल ,जंगल, जमीन यासाठी आंदोलन केले.


या वेळी जांभोरी गावचे माजी सरपंच मारुती केंगले, शामराव बांबळे आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले, बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे, भिमा केंगले, विकास पोटे, दिगंबर केंगले ,अक्षय हिले ,नितीन गिरंगे, पोलीस पाटील नवनाथ केंगले, अक्षय हिले, आकाश केंगले, बाळासाहेब मते ,प्रकाश केंगले, मानाजी केंगले तसेच जांभोरी गावचे ग्रामस्त उपस्थित होते

Previous articleवाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, प्रयागधाम, कोरेगावमूळ, वळती या गावातील शेतकऱ्यांची रिंगरोड रद्द करण्याची मागणी
Next articleसावरदरीत 18 वर्षावरील नागरिकांचे कोविड 19 लसीकरण