बिरसा ब्रिगेड खेड तर्फे डेहणे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

राजगुरूनगर-धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त” बिरसा ब्रिगेड सह्याद्री शाखा खेड व चाकण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती डेहणे च्या सभाग्रहात पार पडले.


बिरसा ब्रिगेड सह्याद्री ही संपूर्ण सह्याद्री मध्ये आदिवासी समाजासाठी अस्मिता, संस्कृती,अस्तित्व आणि आत्मभान ह्या चार मापदंडांवर काम करणारी एक संस्था आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अश्या वेळी आपल्याकडून काही मदत व्हावी ह्या सामाजिक उद्धेशाने हे रक्तदान शिबिर पार पडले.


सदर शिबिराचे उदघाटन जेष्ठ समाजसेवक भोकटे गुरुजी, जेष्ठ समाजसेवक गेनभाऊ वाजे, नामदेव वाजे गुरुजी, खेड तालुका अध्यक्ष एकनाथभाऊ तळपे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठलभाऊ वनघरे, शंकरभाऊ कोरडे (उपसरपंच डेहणे) ह्यांच्या हस्ते झाले. सदर शिबीराचे स्थानिक नियोजन बिरसा ब्रिगेड ग्रामशाखा डेहणे ह्यांनी केले.


सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी अशोक कशाळे, रोहिदास खाडे, कृष्णा वाजे, अक्षय लांघी, भूषण वाजे, रोहन भोकटे, शिवम उबाळे, नवनाथ मेचकर, वर्षा मेचकर, भरत डामसे, प्रकाश मुर्हे(सरपंच), वनराज मुर्हे, समीर मोरमारे, प्रा.अरुण पारधा संदीप बांगर, भरत बांगर(पोलीस पाटील), संतोषभाऊ सुपे, सुदर्शन तिटकारे, अभिषेक तळपे, नथु आढळ सर, सुहास पारधी, अक्षय पारधी रामचंद्र शिंगाडे प्रताप आडेकरयांनी अविरत मेहनत घेतली. चाकण ब्लड बँकेचे डॉ. हिरवरकर व टीमचे मा. सोमनाथ मुर्हे सरांनी आभार मानले.

Previous articleरक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
Next articleवडीलांच्या आजारपणाला कंटाळून बेवड्या मुलाने ब्लेडने चिरला वडीलांचा गळा