माहिती सेवा समितीचे निसर्ग सेवाकार्य कौतुकास्पद – हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर


गणेश सातव, वाघोली

जेष्ठ पत्रकार शरदराव पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बकोरीच्या गायरान डोंगरावर करण्यात आले वृक्षारोपण.

माहिती सेवा समितीचे माध्यमातून बकोरी गावच्या गायरान डोंगरावर लावलेल्या २१००० झाडांच्या संवर्धनासाठी “पाणी आडवा पाणी जिरवा” या संकल्पनेच्या माध्यमातून नैसर्गिक पाणी साठा जमा होण्यासाठी माती बंधाऱ्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दै.सकाळचे जेष्ठ पत्रकार वृक्षप्रेमी शरदराव पाबळे यांचा वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर वृक्षसंवर्धन कार्यसेवेसाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे व धनराज वारघडे यांचा सन्मान शिरुर-हवेली पत्रकार बांधवांच्यावतीने हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते पाटील व प्रांत सचिन बारवकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितामध्ये उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील,अप्पर तहसीलदार विजयकुमार चोभे,मंडल अधिकारी किशोर शिंगोटे,माजी जिल्हा परिषद सदस्य डाॅ.चंद्रकांत कोलते, दै.सकाळचे पत्रकार शरदराव पाबळे,पत्रकार सुरेश वांढेकर, पत्रकार के.डी.गव्हाणे ,पत्रकार सचिन धुमाळ,पत्रकार सुनिल भांडवलकर,पत्रकार पंडीत डोंगरे,पत्रकार विजय लोखंडे, पत्रकार भ्रामणे, बकोरी सोसायटीचे मा.चेअरमन विजय गाडुते,दिपक गाडुते,अशोक वारघडे,म्हस्कु बहीरट,बकोरीचे उपसरपंच संतोष वारघडे, सत्यवान गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शांताराम वारघडे,नवनाथ वारघडे,सुनिल वारघडे,बिवरीचे माजी सरपंच दशरथ गोते , माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,धनराज वारघडे आदी उपस्थित होते.

बकोरीचे डोंगरावर ५ लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे व त्यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती वजा मागणी चंद्रकांत वारघडे यांनी यावेळी केली.

पत्रकार शरदराव पाबळे यांनी याठिकाणी २०१७ पासून कशाप्रकारे जलसंधारणाची व वृक्षरोपणाची कामे केली त्याबाबत सविस्तर माहिती दिली. यापुढेही ५ लाख झाडे लावण्यासाठी सर्व पत्रकारबांधव सहकार्य करतील अशी ग्वाही पाबळे यांनी यावेळी दिली.

Previous articleदौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार अशोक पवार हस्ते ध्वजारोहन