दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहर व तालुका यांच्या वतीने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त दौंड शहरांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालया समोर ध्वजारोहणाची पूजा दौंड पंचायत समिती सभापती हेमलता ताई फडके यांच्या हस्ते करण्यात आली,माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे पाटील, दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्यांक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान, दौंड पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे,माजी शहराध्यक्ष अजित बलदोटा , महिला दौंड तालुका अध्यक्षा योगिनी ताई दिवेकर, महिला शहराध्यक्ष वैशालीताई धगाटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक अध्यक्ष,विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष, ओबीसी विभागाचे अध्यक्ष, दौंड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,महिला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो”, “शरद पवार साहेबांचा विजय असो”अशा घोषणा देऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Previous articleसामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय
Next articleमाहिती सेवा समितीचे निसर्ग सेवाकार्य कौतुकास्पद – हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर