अकरा वर्षाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अमोल भोसले,उरुळी कांचन

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती येथील एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. ०९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.

निकिता लोकेश राठोड (वय-११, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. राठोड रोज दुपारी १ वाजता जेवण्यासाठी घरी जात असतात. नेहमीप्रमाणे राठोड बुधवारी (ता. ०९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेवायला घरी गेले. तेव्हा त्यांना घरामध्ये निकिता आढळून आली नाही. तिचा शोध घेत असताना शेजारच्या खोलीत जाऊन पहिले असता. ओढणीच्या सहाय्याने कपडे अडकविण्याच्या आकडीला (हँगरला) निकिता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला नागरिकांच्या मदतीने खाली घेण्यात आले. निकिताने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. म्हणून तिला उपचारासाठी लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. परंतु तिचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, निकिताच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

Previous articleशशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पाण्याच्या जारचे वाटप
Next articleतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन – नवाब मलिक