शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पाण्याच्या जारचे वाटप

 चाकण- सिद्धेगव्हाण येथे वृक्षारोपण कार्यक्रम  करण्यात आला. यावेळी आंबा,चिंच, जांभुळ, वड या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.तसेच सिद्धेगव्हाण गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या  पाण्याच्या जारचेही वाटप करण्यात आले. पाण्याच्या पिण्याची अडचण ओळखून पाणी वाटप करण्यात आले. पाणी नेण्यास सुलभ व्हावे या उद्देशाने जारचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, युवा उद्योजक उमेश मोरे, खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मुगुटराव मोरे, मा. सरपंच सत्यवान काळे,  मा. चेअरमन बाळासाहेब मोरे, पोलीस पाटील वाल्मिक साबळे,विनायक पवार, बाळासाहेब चौधरी, पांडुरंग साबळे, जयसिंग धाऊत्रे,काळुराम पवार, आनंद साबळे,  स्वप्नील मोरे मनोज मोरे, गणेश मोरे, कपिल मोरे, रणजित मोरे, उदय मोरे इत्यादी उपस्थित होते.
Previous articleखेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान
Next articleअकरा वर्षाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या