खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान

चाकण- खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या स्वयंसेविका, परिचारिका, डॉक्टर यांचा सन्मान सरपंच शशिकांत मोरे मित्र परिवार व संदीप भाऊ साबळे मित्र परिवार कडून करण्यात आले.

यावेळी शशिकांत मोरे यांनी आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरणात शेलपिंपळगाव आरोग्य केंद्र आघाडीवर असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख इंदिरा पारखे, मा. सरपंच मोहन डोमाळे, मा. उपसरपंच सुनील साबळे, युवा नेते संदीपभाऊ साबळे, माऊलीभाऊ साबळे, संदिप शेंडे, अजित वाडेकर अॅड. गणेश साबळे, पांडाभाऊ पानसरे माजी सैनिक उमेश साबळे,बाळा साबळे, मनोज मोरे, व आरोग्य विभागाचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

Previous article५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह दोन माजी सरपंचावर गुन्हा दाखल
Next articleशशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पाण्याच्या जारचे वाटप