संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या रूपाने मदतीला देवच आला धावून

अमोल भोसले,उरळी कांचन

केसनंद येथील सौ हेमलता सूर्यवंशी राहणार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे दाखल करण्यात आले. सौ हेमलाता श्रीमंत सूर्यवंशी यांनी कोरोना आजारामुळे उपचारासाठी व मेडिकल बिल यात 1 लाख 50 रुपये खर्च उपचारा दरम्यान झाला होता. श्रीमंत सूर्यवंशी यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांनी पाहुणे मित्र मंडळी यांच्या कडून उपचारासाठी पैसे उसने घेतले. हेमलता सूर्यवंशी यांनी कोरोना आजारावर मत केली. 3 लाख 29 हजार 982 रुपये एकूण बिल झाले होते. आता एवढे पैसे कोठूण आणायचे हा प्रश्न श्रीमंत सूर्यवंशी यांना पडला.
ही अडचण त्यांनी आपले मित्र अभिमन्यू हरगुडे यांना सांगितली त्यावेळी अभिमन्यू हरगुडे म्हणाले काळजी करू नका.

आपली मदत संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे नक्की करतील. त्याप्रमाणे अभिमन्यू हरगुडे यांनी संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांना ही परिस्थिती सांगितली.

अभिमन्यू हरगुडे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे स्वीय. सहायक तुषार ढोके व स्वीय.सहायक  सागर जाधव यांना सर्व परिस्थिती सांगितली. तुषार ढोके म्हणाले काहीही काळजी करू नका आपण खासदार साहेबांना सांगून मार्ग काढू. त्यानुसार तुषार ढोके यांनी सविस्तर माहिती व बिल मागून घेतले व खासदार डॉ अमोल कोल्हे यांना सविस्तर परिस्थिती सांगितली. त्यानुसार खासदार अमोल कोल्हे यांनी सूर्यवंशी यांच्या कडून सर्व कागदपत्रे व उत्पन्नाचा दाखला घेतला.

खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः लक्ष घालून हॉस्पिटल प्रशासनाशी बोलणे करून सदर व्यक्तीचे बिल माफ करावे असे सांगितले. हॉस्पिटल प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितल्या प्रमाणे श्रीमंत सूर्यवंशी यांनी सर्व कागदपत्रे हॉस्पिटल प्रशासनाकडे जमा केली व हॉस्पिटलने सर्व बिल माफ केले.

याबाबत आमदार अशोक पवार यांनी दहा टक्के राखीव खाटा योजनेतून बिल कमी करावे असे शिफारस पत्र आपले स्वीय सहाय्यक योगेश इंगळे यांच्याकडे दिले होते.

हॉस्पिटल प्रशासनाने सर्व बिल माफ केलेले ऐकल्यावर श्रीमंत सूर्यवंशी हे भाऊक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ते म्हणाले संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या रूपाने आमच्या मदतीला देवच धावून आला, त्यांचे हे उपकार मी आयुष्यभर विसरु शकत नाही.
त्याचप्रमाणे अभिमन्यू हरगुडे, तुषार ढोके, सागर जाधव, योगेश इंगळे यांचे ऋण मानले.

Previous articleशासकीय मुलांची निवासी शाळा पेठ येथे प्रवेश सुरु
Next articleग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे