सांगुर्डी गावातील (पानंद)रस्त्याचे लोकसहभागातून पालटले रुप

सोमनाथ टोपे, चाकण

गेली अनेक वर्षे सतत पावसाळ्याच्या कालखंडात गावातील अनेक शेतकरी,नागरिकांना शेतीची कामे करताना,आपले पशुधन संभभामताना अनेक अडचणीशी सामना करावा लागत असे.परिणामी सतत पडणार्‍या पावसामुळे प्रचंड चिखल,तुडवणे परिसरातील अनेक शेतकर्‍याच्या नशिबी होते.

तुकोबांच्या वाणीनुसार असाध्य ते साध्य।करिसी सायास अभ्यासाकारणे तुका म्हणे।।

या उक्तीप्रमाणे गावातील अनेक युवक, शेतकरी तसेच सांगूर्डी (खेड) ग्रामपंचायतच्या सहकार्यातून पुढाकार घेत कृष्णकमल हौ.सोसायटी ते गावच्या दक्षिण बाजूस असलेलेवडजाई परिसरातील ओढ्यापर्यत सुमारे दिड किं.मी.रस्त्याचे रुंदीकरण असे मुरमीकरणाचे काम संपन्न झाले.

सदरचे कामकाज करणेकामी खेड तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे चिटणीस श्री.वसंतराव भसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यासाठी सांगुर्डी गावातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी वश्री.शेखर भसे विकास भसे,माजी उपसरपंच श्री.अंकुश भसे,मा.तंटामुक्ती अध्यक्ष श्री.संतोष भसे,श्री.गणेश श्री.अनिल भसे,श्री.सचिन लिंभोरे,श्री.नारायण भसे,श्री.आनंदा भसे,श्री.चंद्रकांत भसे,श्री.संजय भसे,श्री.सागर भसे,राहुल भसे श्री.वृदांवन भसे,रामभाऊ भसे,श्री.संदीप भसे,अनेक युवक कार्यकर्ते ३दिवस जे.सी.बी.ट्रॅक्टर,हायवा,रोलर यंञाद्वारे काम करीत असल्याने सर्वांनी आनंद समाधान दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन व्यक्त केले.

Previous articleसंत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा
Next articleउरुळी कांचन ‘च्या महिला सरपंचा विरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापुर्वीच रद्द