शासकीय मुलांची निवासी शाळा पेठ येथे प्रवेश सुरु

पुणे-अनुसूचित जाती, नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा (पेठ, ता.आंबेगाव, जि. पुणे ) येथे 2021-22 साठी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमासाठी इयत्ता 6 वी 10 वी मधील रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.

प्रवेश अर्ज सकाळी 10 ते 5 या वेळेत शाळेमध्ये विनामुल्य उपलब्ध होतील. शाळेमध्ये अनुभवी व तज्ञ शिक्षक, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व 3 मजली इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय,24 तास वीज व पाणी तसेच 3 हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय व वाचनालय आदी सुविधा उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के तर अपंगांसाठी 3 टक्के याप्रमाणे जागा आरक्षित राहतील.

अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.बी. खाडे, मोबाईल क्रमांक 8999042428 किंवा गृहपाल श्रीमती एस.एस. कुलकर्णी, मोबाईल क्रमांक 9423013063 येथे संपर्क साधावा, असे शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.बी. खाडे यांनी कळविले आहे.

Previous articleशासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर जेरबंद
Next articleसंसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या रूपाने मदतीला देवच आला धावून