शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर जेरबंद

अमोल भोसले

शिरुर तहसिल कार्यालयातील महसुल खात्याचे अधिकारी व पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व चोरी यावर कारवाई करत असताना कारेगाव (ता. शिरूर जि. पुणे) हद्दीत फलके मळा येथे हायवा ट्रक नं. एम. एन. १२ क्यु. डब्ल्यु. ९९९५ हा पुणे नगर हायवे रोडने पुणे बाजुकडे जात असताना पथकाने हायवा ट्रक थांबवून पाहणी केली असता.त्यामध्ये वाळु असल्याचे पथकाला आढळून आले. चालकास स्वामीत्व धनाची पावतीची मागणी महसुल खात्याचे पथकाने केली असता, चालकाजवळ पावती मिळून आली नाही. त्यावेळी महसुल खात्याचे पथकाने चालकास हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यास सांगितला. महसूल खात्याचे पथक हायवा ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन च्या दिशेने घेवून जाताना आरोपी धीरज पाचर्णे हा त्याचेकडील स्विफ्ट कार नं. एमएन १२ क्यु एम ००१२ हि मधून पाठीमागून आला व त्याने हायवा ट्रक थांबवून चालकास खाली उतरवून हायवा ट्रक मधील वाळू रोडचे कडेला हायवाचे हायड्रोलिकने खाली केली आणि महसुल खात्याचे पथकाने शासकीय कामात अडथळा आणून त्यांना दमदाटी करून चालकास घेवून निघुन गेला. हायवा ट्रक महसूल खात्याचे पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन येथे आणून रांजणगाव पोलीस स्टेशन गुरन ३५३/२०२० भादवि.का.क. ३५३, ३७९,३४ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर गुन्हयातील आरोपी धीरज जगन्नाथ पाचर्णे (वय ३० वर्षे रा. तर्डोबाचिवाडी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) हा गुन्हा केल्यानंतर सुमारे सात महिन्यापासून फरार होता. सदरचा आरोपी हा शिरूर बायपास परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाल्याने तात्काळ त्यांनी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या तपास पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे सपोनिसचिन काळे, पोहवा जनार्दन शेळके, पो.ना अजित भुजबळ, पो.ना राजु मोमीण, पो.ना. मंगेश थिगळे यांनी केली आहे.

Previous articleलोणी काळभोर- २२ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleशासकीय मुलांची निवासी शाळा पेठ येथे प्रवेश सुरु