पिरंगुट येथील एमआयडीसी एस व्ही एस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत भीषण आग

अमोल भोसले,पुणे

पिरंगुट जवळच्या उरवडे येथील एमआयडीसी च्या एस व्ही एस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत पंधरा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. मात्र आग लागली, तेव्हा कंपनीत 40 पेक्षा जास्त कामगार काम करत होते अशी माहिती मिळत आहे.

या भीषण आगीने रौद्ररूप धारण केले आतापर्यंत या कंपनीतून 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली जात असून, अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हेदेखील कंपनीच्या स्थळाकडे रवाना झाले आहेत.

दुपारी दोन वाजता कंपनीत आग लागली se.s. एक्वा टेक्नोलॉजी अशी ही कंपनी असून या कंपनीमध्ये आग लागल्यापासून सतरा जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

Previous articleमुळशी तालुक्यात रासायनिक कंपनीला आग, १५ महिलांचा मृत्यू
Next articleलोणी काळभोर- २२ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या