नारायणगाव येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा

नारायणगाव (किरण वाजगे)

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी खासदार आढळराव यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व चालू असलेल्या अन्नदानाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी गेली चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या विठाई साबीर लंगर जेवनाचे वाटप देखील खासदार आढळराव यांच्या हस्ते करण्यात आले. हे जेवण युवा नेते सुजित खैरे यांच्या वतीने देण्यात आले. रोज सुमारे दोनशे गोरगरिबांना या लंगर द्वारे जेवण देण्यात येते.

या कार्यक्रमानिमित्त शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, सुनील बाणखेले, समाजसेवक राजाभाऊ पायमोडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच महेश शेळके, प्रियंका शेळके, रोहिदास तांबे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट,अनिल खैरे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


याच वेळी राजूरी येथे मुस्लिम बांधवांनी सुरु केलेल्या कोवीड सेंटर साठी सरपंच योगेश पाटे यांच्या वतीने एक साऊंड आणि माईक भेट देण्यात आला.
याच कार्यक्रमात स्वर्गीय मंगेश नारायण डेरे यांच्या स्मरणार्थ डेरे कुटुंबीयांनी ५० किलो धान्य लंगर साठी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले तर आभार हेमंत कोल्हे यांनी मानले.

Previous articleकोरोना काळात अन्नदान करणाऱ्या भटकंती ट्रेकर्स ग्रुप ला ६६ हजार रुपयांची मदत
Next articleअनलॉकची प्रक्रिया सुरु करणार केल्याने आगामी काळात पर्यटनास बहर येणार