संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा

Ad 1

गणेश सातव,वाघोली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे होणारा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७० वा समाधी सोहळा यावर्षी जिल्ह्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता अत्यंत साधेपणाने कसबा पेठ पुणे येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन व शासन नियमाप्रमाणे मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. समाज बांधवांनी घराबाहेर न पडता साध्या पद्धतीने हा सोहळा आपापल्या घरांमध्ये साजरा करावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेचे पुणे शहराध्यक्ष संदीप लचके व सचिव सुभाष मुळे यांनी केले.

यावेळी प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर पाटेकर,राहुल सुपेकर,विजय कालेकर,मनोज बारटक्के,अरविंद हेन्द्रे हे समाज बांधव या वेळी उपस्थित होते. ह.भ.प.रुक्मिणीताई पारेकर यांनी अभंगाद्वारे वंदन केले.अँड.सागर मांढरे व विशाल पोरे यांनी आरती केले व सरतेशेवटी श्रीकांत कारंजकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.