गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदत करतो त्याच्या पाठीमागे सदैव उभे राहू

चाकण – मागील आठ दिवसात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत १००० निराधार कुटुंब व गोरगरीब कुटुंबापर्यंत अन्नधान्य राशन किट पोचविण्याचा संकल्प पूर्ण करून कडाचीवाडी मध्ये या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करत असताना गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनचे कौतुक केले बोलताना पुढे म्हणाले की “जो गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदत करतो पुढील काळात आपण त्याच्या पाठीशी सदैव उभे राहू.

यावेळी माजी उपसरपंच मनोज खांडेभराड ,पांडुरंग लष्करे, बाबासाहेब कड, महेंद्र शेठ मेदनकर,संजय वाघमारे,राजु ठाकर,संपत खांडेभराड,शाम दौंडकर, विशाल कड, सुधीर कड, निरंजन लष्करे, रणजित गाडे, नितीन गाडे,साहिल भाऊ वाळके, ओंकार शेटे आदी उपस्थित होते.


कोरोनाच्या संकटामुळे (covid 19) अनेकांना आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याची पाळी आल्याने व संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेली टाळेबंदी यामुळे गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने अनेक गरीब कुटुंबाच्या चुली कशा पेटतील हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असताना पै.गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जवळपास एक हजार कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करून या संकट काळात गरीब कुटुंबाच्या चुली पेटविण्याचे काम करून माणुसकीचा मोठा नमुना समाजासमोर ठेवला आहे.

खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांनी हा वाढदिवस हार,तुरे,फ्लेक्स न लावता कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश बोत्रे व गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांनी एक हजार अन्नधान्याचे किट बनविले. साधारण वीस ते तीस दिवस पुरेल एवढे अन्न पॅक करून ते गरीब कुटुंबापर्यंत पोहोचविले.

कोरोनाने लोकांचे हात थांबल्याने त्यांची होणारी परवड या मदतीने काहीप्रमाणात का होईना थांबली आहे.

Previous articleलोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या प्रथम सभेत कामकाज चर्चा व मान्यवरांचे सत्कार तसेच पत्रकार व कोरोना बळींना श्रध्दांजली
Next articleशिवशंभो छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव येथे शिवस्वराज दिन साजरा