नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची भेट

नारायणगाव येथे covid-19 उपचार केंद्र सुरु करण्याचे नियोजन

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्याच्या हेतूने आज पुणे जिल्हा परिषद चे सीईओ आयुष प्रसाद यांनी भेट दिली.
प्रस्तावित असलेले कोवीड उपचार केंद्र नारायणगाव ग्रामिण रूग्णालयामध्ये करण्याचे नियोजन आहे म्हणून आज आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदचे सीईऒ आयुष प्रसाद , जि प सदस्या आशाताई बुचके, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे , तहसिलदार हनुमंत कोळेकर साहेब, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी भेट दिली. याप्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, आरोग्य अधिकारी तथा सिविल सर्जन अशोक नांदापूरकर, डॉ वर्षा गुंजाळ , डॉ प्रशांत शिंदे, संतोष नाना खैरे, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकरे, श्री मूळूक आदी उपस्थित होते.

यावेळी आयुष प्रसाद यांनी प्रशासनातील कोविड 19 च्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रशासन व कोवीड ग्रस्त रुग्ण यांच्यामध्ये सुसूत्रता व समन्वय साधण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनीदेखील मार्गदर्शक सूचना केल्या.

Previous articleअजितदादा पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी चाकण येथील संगिता वानखेडे या महिलेवर वर गुन्हा दाखल
Next articleसंत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा